जागतिक क्रमवारीत फुलराणी पहिल्या पाचमध्ये

saina-nehwal
नवी दिल्ली : जागतिक बॅटमिंटन महासंघाने आज जाहिर केलेल्या क्रमवारीत भारताची फुलराणी म्हणून ओळखली जाणारी खेळाडू सायना नेहवाल पहिल्या पाच खेळाडूंमध्ये दाखल झाली आहे. सायना पहिल्या पाच खेळाडूंमध्ये डेनमार्क आणि पेंच ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्यामुळे दाखल होऊ शकली.

जागतिक क्रमवारीतील दोन नंबरची खेळाडू असलेली चीनची शिजियान वांगच्या विरुद्ध सायनाला दोन्ही स्पर्धेत पराभव पत्करावा लागला होता. तर पी.व्ही. सिंधूला पेंच ओपनच्या पहिल्या फेरीतच हार स्वीकारावी लागल्यामुळे ती दहाव्या स्थानावर कायम आहे.

Leave a Comment