सेन्सेक्सने पार केला २७ हजारांचा टप्पा

share-market
मुंबई – शेअर बाजाराच्या आज दुपारच्या सत्रात निर्देशांकात २५० पेक्षा जास्त अंकांची वाढ होऊन, तो २७३५८ या विक्रमी पातळीला पोहोचला असून राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीच्या निर्देशांकात ७५ अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टीही विक्रमी ८१८० पर्यंत पोहोचला आहे.

परदेशी गुंतवणूकीचे केंद्र सरकारने नियम शिथिल केल्याने, अनेक परदेशी कंपन्यांना सहजतेने भारतात गुंतवणूक करता येणार आहे तसेच आंतरराष्ट्रीय तेल बाजारात चारवर्षात प्रथमच तेलाच्या किंमती घसरल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसत आहे. तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे भारताची वित्तीय तूटही कमी होण्यास मदत होणार आहे. आयटी आणि बांधकाम कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आहे.

Leave a Comment