शपथविधी सोहळ्याला जाणार नाही राज ठाकरे

raj-thackary
मुंबई – भारतीय जनता पक्षाचे उद्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन केले जाणार असून या भाजपने समारंभ सोहळ्याला उपस्थितीत राहण्यासाठी सर्वच क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण पाठविले असून यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरेंचाही समावेश आहे. मात्र, उद्याच्या शपथविधी सोहळ्याला आपण जाणार नसल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. आपण भावी मुख्यमंत्री राज ठाकरे यांचे अभिनंदन केले असून, भावी काळासाठी शुभेच्छाही दिल्याल्यामुळे समारंभाला गेलेच पाहिजे असे नाही. याउलट आपण हा समारंभ टीव्हीवर घरातच कुटुंब व कार्यकर्त्यांसोबत बसून पाहू असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

‘न भूतो न भविष्य’ असा भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा करण्याचा प्रयत्न प्रदेश भाजपचा असून त्यासाठी कोणतेही कसूर ठेवण्यात येणार नाही. यासाठी २१ समित्या स्थापन केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, भाजपचे इतर राज्यातील मुख्यमंत्री, भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योगजगत, कला, क्रीडा, चित्रपट आदी क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण धाडण्यात आली आहेत.

Leave a Comment