शपथविधी सोहळा घेणार इव्हेंटचे स्वरूप

wankhede
मुंबई – राज्यातील विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यावेळी छोटेखानी मंत्रिमंडळाचाही शपथविधी होईल. भाजपच्या नेतृत्वाखाली राज्यात पहिल्यांदाच सरकार बनत असल्याने हा सोहळा भव्य करण्याचा चंग भाजपने बांधला असून राज्याच्या सत्तेत सहभागी होण्यापूर्वीच भाजप सरकारने उधळपट्टी करण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या चार तास चालणा-या शपथविधीसाठी जनतेच्या कोटीच्या कोटी रुपयांचा चुराडा करण्यात येणार आहे. यासाठी राजकीय नेते, उद्योगपती, अधिकारी, खेळाडू, कलाकारांसह अंदाजे तीस हजार जणांना निमंत्रणे पाठवली आहेत. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी राजशिष्टाचार विभागास वेठीस धरले आहे.

हा सोहळा दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होणारा असून तीन ते चार तास चालेल. त्यासाठी कोटीच्या कोटी रुपये उधळले जाणार आहेत. याचा बराचसा भार हा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होणा-या या सोहळ्यासाठी मैदानाच्या एका भागात भव्य स्टेज उभारले जाणार आहे. या स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा सांगणारा सेट असेल. त्याच बरोबरीने विकास या थीमवर आधारित दुसरा सेट उभारला जाईल. या सेटसाठीच दीड कोटींपेक्षा अधिक खर्च झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Comment