पश्‍चिम रेल्वेला लाभणार ऑटोमेटीक दरवाजे

western
मुंबई – मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये लवकरच आपल्याला एक बदल पाहायला मिळणार असून मुंबईच्या पश्चिम रेल्वेला ऑटोमॅटिक दरवाजे बसविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरही सोय पहिल्यांदा उपलब्ध होणार असून प्रायोगिक तत्त्वावर त्याचा पहिला मान लेडीजच्या फर्स्टक्लास डब्याला मिळणार आहे. ही सोय प्रत्यक्षात सुरू होण्यास २०१५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर हेमंत कुमार आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी महालक्ष्मी कारशेडला भेट दिली. त्यावेळी कारशेडमध्ये या ऑटोमॅटिक दरवाजांची चाचणी केली. तसेच आठ आठवड्यांच्या आतच प्रत्यक्ष रेल्वे मार्गावर त्याची पाहाणी करण्यात येईल.

Leave a Comment