खुशखबर! पेट्रोल आणि डिझेलचे दर २.५० रुपयांनी कमी होणार!

petrol
नवी दिल्ली – वाहनचालकांसाठी खुशखबर असून केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर २.५० रुपयांनी कमी करण्याची शक्यता आहे आणि जर का असे झाले तर ऑगस्टनंतर ही सहावी वेळ असेल की पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले जाणार आहेत.

याबाबत असे देखील कयास लावले जात आहे की हा निर्णय जम्मू−काश्मीर आणि झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही कपात केली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. डिझेलचे दर घटल्यास महागाई कमी होण्यास मदत होणार आहे. दिवाळी पूर्वी केंद सरकारने डिझेलच्या दरात तीन रूपयांची कपात केली होती. आता पुन्हा डिझेलच्या किंमती घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’च्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment