अहमदाबाद, वाराणसीत उतरणार सौरऊर्जेवर उडणारे विमान

solar
पेयर्ने (स्वित्झर्लंड) – स्वित्झर्लंडमध्ये सौरऊर्जेवर उडणार्‍या पहिल्या विमानाच्या विश्‍वभ्रमण करण्याच्या मोहिमेची जय्यत तयारी सुरु झाली असून, या विश्‍वभ्रमण मोहिमे दरम्यान हे विमान अहमदाबाद आणि वाराणसी या दोन शहरांमध्ये उतरणार आहे

सौरऊर्जेवर उडणारे हे विमान २०१५च्या मार्च महिन्यात अबुधाबी येथून अहमदाबाद येथे येणार असून, पॅसिफिकच्या पुढच्या प्रवासासाठी रवाना होण्यापूर्वी वाराणसी येथेही उतरणार आहे. या अनोख्या प्रयोगासाठी पुढाकार घेणारे बेरट्रान्ड पिकार्ड यांच्या मते, अहमदाबाद आणि वाराणसी या शहरांची निवड करण्यामागे कोणतेही राजकारण नसून, अनुकूल हवा म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. मी अहमदाबाद येथे असताना नरेंद्र मोदी यांची दोनवेळा भेट घेतली आहे. या शहरांची निवड करण्यामागे फक्त आणि फक्त हवामानविषयक गरज लक्षात घेण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment