सावंतवाडी – आमदार दीपक केसरकर यांची काळ्या पैशाच्या यादीत समाविष्ट असलेल्या गोव्याच्या तिंबलो उद्योग समुहातील संचालकांशी मैत्री असून यामुळे त्यांचीही चौकशी करावी, या मागणीसाठी मनसेतर्फे आंदोलन करणार, असा इशारा माजी आमदार तथा मनसेचे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी आज येथे दिला.
दीपक केसरकरांचे काळ्या यादीतील उद्योजकांशी संबंध : परशुराम उपरकर
विधानसभेत झालेल्या पराभवानंतर आपण व कार्यकर्ते खचून जाणार नाहीत. आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी जोमाने काम करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. श्री. उपरकर यांनी विधानसभेच्या निकालानंतर आज प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांची येथील मध्यवर्ती कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष महेश भाईडकर, शहराध्यक्ष सागर कांदळगावकर, श्रेया देसाई, गुरुदास गवंडे आदी उपस्थित होते.