शिवसेना दोन दिवसांत करणार पाठिंब्याची अधिकृत घोषणा

shivsena
मुंबई – शिवसेनेने भाजपसमोर गुडघे टेकण्याचा निर्णय घेतला असून कोणतीही अट घालता शरण येण्यास सज्ज झालेल्या शिवसेनेच्या पदरात भाजप कोणती मंत्रिपदे महामंडळे घालते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांत पाठिंब्याची अधिकृत घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपचा तोडफोडीचे राजकारण करण्याचा पवित्रा आहे. दोन तृतीयांश सदस्य एका पक्षातून फुटले तर ती फूट वैध ठरते. त्यामुळे शिवसेनेचे ४२ आमदार फोडता येतील काय अशी चाचपणी सुरू असतानाच सत्तेत गेल्यास काही आमदार भाजपसोबत जाण्याची धास्ती शिवसेनेला वाटत आहे.

Leave a Comment