
हैदराबाद – जागतिक क्रमवारीच्या महिला दुहेरीत (डब्लूटीए) अव्वल रँकिंग मिळवण्याचे लक्ष्य भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने ठेवले आहे.
डब्लूटीएच्या अव्वल सानियाचे लक्ष्य
डब्लूटीएच्या अव्वल पंक्तीत स्थान मिळवायला कुणालाही आवडते आणि मी त्या दिशेने वाटचाल केली आहे. माझी मागील कामगिरी पाहता माझ्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्यात. मी डब्लूटीए टूर फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकण्याचे माझे अनेक वर्षाचे स्वप्न होते. आता डब्लूटीए दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याचा माझा प्रयत्न आहे. पुढील वर्षी अव्वल रँकिंग मिळवेन, असा विश्वास सानियाने हैदराबादमध्ये तिच्या टेनिस अॅकॅडमीत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
