देशातील वायफाय देणारे पहिले रल्वे स्टेशन - Majha Paper

देशातील वायफाय देणारे पहिले रल्वे स्टेशन

wifi
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बंगळूरू शहरातील रेल्वे स्टेशन देशातील पहिले असे रेल्वे स्टेशन बनले आहे जिथे प्रवाश्यांना हायस्पीड इंटरनेट सुविधा देण्यासाठी वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे.

ह्या रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर सुरुवातीची ३० मिनिटे मोफत वायफाय वापरता येऊ शकते, मात्र त्यानंतर प्रवाश्यांना एक स्क्रैच कार्ड विकत घ्यावे लागणार आहे. हे स्क्रैच कार्ड वायफाय मदत कक्षेत उपलब्ध असेल.

याबाबत अधिक माहिती देताना रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि स्क्रैच कार्डची किमत ३० मिनिटांसाठी २५ रुपये, १ तासासाठी ३५ रुपये असेल. हे स्क्रैच कार्ड २४ तासांसाठी वैध राहील.

Leave a Comment