शिवछत्रपतींच्या समाधीवर अंधार

maharaj
रायगड – ऐन दिवाळीतही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची उपेक्षा झाली. सगळीकडे दिव्यांनी प्रकाशमान झालेले असताना किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तसेच जगदीश्‍वर मंदिराचा परिसर मात्र काळोखात बुडाला. या किल्ल्याची देखभाल करणार्‍या केंद्रीय पुरातत्व विभागाने या ठिकाणचे थकीत वीज बिल न भरल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे उघडकीस आले आहे.

गडावर येणार्‍या शिवप्रेमींकडून केंद्रीय पुरातत्व विभागाच्या या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून वीज पुरवठा खंडित केल्यामुळे गडावरील पाणीपुरवठादेखील बंद आहे. गडावर विद्युत सुविधेसाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत विद्युत मीटर बसविण्यात आले असूनही विद्युत बिले पुरातत्व विभागामार्फत भरली जातात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून थकीत असलेल्या १८ हजार ६३० रुपयांच्या बिलांचा भरणा न केल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केल्याचे उघडकीस आले.

Leave a Comment