राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव सादर

devendra-fadnavis1
मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पश्चिमचे आमदार देवेंद्र फडणवीस यांची निवड विधिमंडळ पक्ष नेतेपदी झाली त्यानंतर सायंकाळी सात वाजता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवनात भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा प्रस्ताव सादर केला असून यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे त्यांच्यासोबत होते.

नागपूरमध्ये देवेंद्र यांच्या घराबाहेर दिवाळी साजरी होत आहे. नागपूरमध्ये त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. फटाके फोडून आणि पेढे वाटून कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. देवेंद्र फडणवीस ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment