मुख्यमंत्र्यांनी दडपली भ्रष्टाचाराची ७६ प्रकरणे

prithviraj
मुंबई : ‘स्वच्छ कारभार करणारे मुख्यमंत्री’ अशी ख्याती असणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराची ७६ प्रकरणे दडपल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांची या वृत्तामुळे ‘मिस्टर क्लिन’ ही प्रतिमा डागाळली आहे.

लाचलुचपत विभागाने मुख्यमंत्र्यांकडे माजी मंत्री छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासह अनेक मोठया अधिका-यांच्या चौकशीसाठी परवानगी मागितली होती. पण भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत या चौकशीला परवानगी दिली नसल्याचा दावा इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तात करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment