मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस

devendra-fadnavis
मुंबई – विधिमंडळात भाजपच्या सर्व आमदारांची संसदीय पक्षाच्या झालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून एकनाथ खडसे यांनी या बैठकीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचवले. त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी अनुमोदन दिले. यावेळी विधीमंडळ गटनेतेपदीही देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली.

आज दुपारी ही बैठक भाजपचे निरीक्षक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस जे. पी. नड्डा, माजी प्रभारी राजीव प्रताप रूडी आणि ओमप्रकाश माथूर आदी नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली.