अवघ्या १६४९ रुपयांत नोकियाचा १३०

nokia-130
नवी दिल्ली – मायक्रोसॉफ्ट डिव्हाइसेसने स्मार्टफोनच्या जमान्यात ‘नोकिया १३०’ हा एंट्री लेव्हल डय़ुअल सिम मोबाइल फोन भारतात लाँच करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. यासाठी पहिल्यांदाच मोबाइल फोन वापरणारे आणि संगीतप्रेमींसाठी बॅकअप फोन वापरणारे अशा गरजा नजरेसमोर ठेवून हा फोन बनवण्यात आला असून अवघ्या १६४९ रुपये अशा आकर्षक किमतीत तो उपलब्ध केला आहे.

‘नोकिया १३०’मध्ये बिल्ट-इन व्हीडिओ प्लेअर, म्युझिक प्लेअर असून यावर संगीतप्रेमी दरदिवशी एका चार्जवर अनुक्रमे १६ तास आणि ४६ तास आस्वाद घेऊ शकतात, असा दावा मायक्रोसॉफ्टने केला आहे. तगडी बॅटरी लाइफ, फ्लशलाइट, एफएम रेडिओ आणि यूएसबी चार्जिग ही या फोनची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. १.८ इंचाचा डिस्प्ले असलेल्या या फोनवर कमाल स्टँडबाय टाइम ३६ दिवसांचा असून टू-जी नेटवर्कवर १३ तासांचा टॉकटाइम मिळतो, असे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment