लोकल प्रवासादरम्यान दिला बाळाला जन्म

local
मुंबई – मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन गर्दी, धक्काबुक्की, शिवीगाळ, भांडणासाठी प्रसिद्ध आहे. पण लाईफलाईनच्या विरार-बोरीवली रेल्वे मार्गावर आज सकाळी सव्वासहाच्या दरम्यान आनंदाचे वातावरण पसरले. रेल्वेच्या डब्यातच बाळाचा जन्म झाला आणि प्रवासी आपल्या नेहमीच्या अडचणी आणि हेवेदावे विसरुन बाळाचे कौतुक करण्यात गुंगून गेले.

विरारच्या फुलपाडात राहणार्‍या माला चौधरी (३०) यांना कांदिवलीच्या डॉ. आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेत होते. माला चौधरी यांच्यासोबत त्यांच्या सासूबाई होत्या. गाडी भाईंदर स्टेशनजवळ असताना माला याला प्रसूती वेदना होऊ लागल्या. अखेर सहप्रवासी महिला मदतीला धावून आल्या आणि डब्यातच मालाने बाळाला जन्म दिला. मुलगा झाल्याची बातमी डब्यात पसरली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून नव्या जीवाचे स्वागत केले.

Leave a Comment