लंडन – भारताकडून काश्मीर हिसकावून घेण्याचे वक्तव्य करणारे पाकिस्तान पिपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो यांना त्यांच्याच देशाच्या नागरिकांनी लंडनमध्ये अंडी आणि टॉमेटो फेकून स्वागत केले असून त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्याचा विरोध दर्शवला आहे.
अंडी आणि टॉमेटोने केले बिलावल भुत्तोचे स्वागत
भारताकडून काश्मीरमध्ये मानवाधिकारांची पायमल्ली होत असल्याच्या कारणावरून लंडनमध्ये राहणा-या पाकिस्तानी नागरिकांनी ‘मिलियन मार्च’चे आयोजन केले होते. यावेळी बिलावल या मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचल्यामुळे आंदोलक चिडले आणि त्यांनी बिलावल यांच्या विरोधात ‘बिलावल वापस जाओ’ अशी घोषणाबाजीही केली. बिलावल यांना काश्मीरच्या मुद्यावर राजकारण करू देणार नसल्याची प्रतिक्रिया मार्चमध्ये उपस्थित असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी दिली.