राज्यपालांनी दिले दलित हत्या प्रकरणी विशेष पथक नेमण्याचे आदेश

vidyasagar
मुंबई – राज्यपाल विद्यासागर राव यांनी पोलिस महासंचालक संजीव दयाल यांना अहमदनगर जिल्ह्यातील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांड प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष कार्य पथक नेमण्याचे आदेश दिले.

राज्यपालांची यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी भेट घेतली. त्यानंतर राज्यापालांकडून आदेश देण्यात आले आहेत. अहमदनगरमध्ये घडलेले कृत्य हे अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत या प्रकरणी भरपाई म्हणून मृतांच्या नातेवाईकांना ३ लाख रुपये देण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले.

राजभवन येथे रामदास आठवले यांच्यासह आरपीआयच्या २० सदस्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि या प्रकऱणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. घटनेला चार दिवस उलटल्यानंतरही कोणतीच कारवाई होत नसल्याने आरोपींनी तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

२१ ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखडे खालसा या गावातील दलित कुटुंबातील संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव आणि सुनील संजय जाधव तिघांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती.

Leave a Comment