धोनीकडे रांची रेंचे मालकत्व

dhone
रांची : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेन्द्रसिंग धोनी याला बाईकची आवड, मोटर स्पोर्टस हा त्याचा आवडता क्रीडा प्रकार. फुटबॉल खेळल्याशिवाय त्याला करमतच नाही, संघातील सर्व खेळाडूंना त्याने फुटबॉलचे वेड लावले. यापुढे धोनी हॉकीतही उतरला आहे. तो हॉकी इंडिया लीगमधील रांची फ्रेंचाईजीचा मालक झाला आहे. त्याने सहारा इंडिया परिवारासोबत रांचीचा संघ खरेदी केला आहे.

यापूवीं सहारा इंडिया परिवार हॉकी इंडिया लीगमधील उत्तर प्रदेश विझार्ड संघाचा मालक आहे. रांची फ्रेंचाईजला आता रांची रेंज या नावाने ओळखले जाणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत होणार्‍या हॉकी इंडिया लीगच्या तिसर्‍या सत्रात सहभागी होणार आहे.

आज धोनीच्या उपस्थितीत संघाचा लोगो आणि जर्सीचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी धोनी उपस्थित होता.

मी क्रिकेटपटू असल्याने सर्वप्रथम क्रिकेटलाच प्राधान्य देणार. पण एक खेळाडू असल्याने माझे मन अन्य क्रीडाप्रकारातही गुंतले असते. हॉकी हा राष्ट्रीय खेळ असल्याने त्यासाठी पुढे सरसावणे, त्यातही एका संघाचा मालक होणे हे माझे भाग्य समजतो या शब्दात धोनीने भावना व्यक्त केली.

Leave a Comment