विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद तटकरेंना मिळणार

sunil-tatkare
मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुनील तटकरे यांना आता मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून आघाडीचे सरकार असताना त्यांनी अन्न- नागरी पुरवठा- नगरविकास राज्यमंत्रीपद त्यानंतर अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री ही कॅबिनेट मंत्रीपदे भूषवली आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात विधानसभेचे पहिले अधिवेशन घेण्याची शक्यता असून, याच अधिवेशनात सभापती, उपसभापतींसह विरोधी पक्षनेते पदांची निवड होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे कॉंग्रेसपेक्षा ५ अधिक आमदार असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनाच विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे. या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे.

Leave a Comment