
रत्नागिरी – भाजपाच्या उमेदवारांचा नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोकणातील सर्वच जागांवर पराभव झाल्यामुळे कोकणातील भाजपला सुरक्षित ठेवून संघटन वाढवण्यासाठी भाजपा प्रदेश प्रवक्ते बाळ माने यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील भाजपाच्या पराभूत उमेदवारांमध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या बाळ माने यांना इतर उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. याच मताधिक्क्यामुळे बाळ माने यांना राज्यमंत्रीपद देण्याच्या सूचना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून केल्या जात असल्याचे समजते. बाळ मानेंसारखा तरुण नेता कोकणातील ढासळती अवस्था सांभाळू शकेल, असा विश्वास वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे कार्यकर्ते मिळणार्या मंत्रीपदाकडे डोळे लावून आहेत.
