प्लास्टीक पिशव्यांच्या बंदीला मुंबईकरांचा सकारात्मक प्रतिसाद

plastic
मुंबई – पर्यावरणाचा प्लास्टिक पिशव्यांमुळे र्‍हास होत असल्याने या पिशव्या टाळण्याच्या महापालिकेच्या आवाहनाला मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून मागील तीन वर्षांत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात घट होत असल्याचा दावा पालिकेतर्फे करण्यात आला आहे. मुंबई प्लास्टिक साक्षर होत असल्याचे हे चिन्ह आहे.

पालिकेच्या बंदीनंतरही पिशव्यांच्या उत्पादकांनी छुप्या पद्धतीने उत्पादन सुरूच ठेवले. परिणामी पालिकेने सुरू केलेल्या प्लास्टिक पिशवी बंदीला नव्या आव्हानाला सामोरे जावे लागले. उत्पादक कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी प्रशासनाने दंडात्मक कारवाईत मोठ्या प्रमाणात वाढ केली. तसेच उत्पादकांच्या गोदामांवर छापासत्र सुरू केले. एकीकडे कारवाई आणि दुसरीकडे सामाजिक संस्थांच्या मदतीने पालिकेने जनजागृती मोहीम राबविली. या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळाला असून पिशव्यांच्या वापरात तसेच दंडात्मक कारवाईत घट झाली आहे, अशी माहिती पालिकेच्या दुकाने आणि आस्थापना विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

Leave a Comment