सहा महिन्यांत करा कागदपत्रांची पूर्तता अन्यथा तुमचे बॅंक खाते बंद!

rbi
मुंबई – बॅंक खातेदारांनी वारंवार सूचना दिल्यानंतरही केवायसीच्या कागदपत्रांची पूर्तता केली नसेल तर अशा खातेदारांचे बॅंक अकाउंट सहा महिन्यांत बंद केले जाणार असून केवायसीच्या नियमांचे पालन करणे बॅंक खातेदारांना बंधनकारक असल्याचेही भारतीय रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने केवायसीची कागदपत्रे संबंधित बॅंकेत जमा न करणार्‍या ग्राहकांचे खाते बंद सुरुवातीला तात्पुरत्या आणि नंतर कायमस्वरुपी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या खातेदारांनी बॅंकेने वारंवार सूचना देऊनही आवश्यक ती कागदपत्रे बॅंकेत जमा केले नसतील, अशा खातेदारांना नोटिस बजावली जाणार आहे. नोटीस बजावल्यानंतरही खातेदाराने आवश्यक कागदपत्रे बॅंकेत न जमा केल्यास खातेदाराचे बॅंक खाते सहा महिन्यांत टप्प्याटप्याने बंद करण्यात येणार आहे. आरबीआयने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे.

Leave a Comment