सरिता देवींवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा

sarita-devi
नवी दिल्ली – आशियाई क्रीडा स्पर्धेत पंचांचा निर्णय मान्य नसल्याने, पोडियमवर कांस्यपदक स्वीकारण्यास नकार देणारी भारताची महिला बॉक्सर एल.सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने कठोर कारवाई केली आहे.

आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमधील ६० किलो गटात सरिता देवीची दक्षिण कोरियाच्या जिना पार्कशी लढत होती. या लढतीमध्ये पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे जिना पार्क विजयी झाली व सरिता देवी यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सरिता देवीने पदक प्रदान सोहळ्यात पाणावलेल्या डोळ्यांनी कांस्य पदक स्वीकारण्यास नकार दिला व ते पदक द.कोरियाच्या जिना पार्ककडे देऊन तिथून निघून गेली. मात्र त्यानंतर सरिता देवी यांना त्यांची चुक लक्षात आली व त्यांनी महासंघाची बिनशर्त माफीही मागितली होती. मात्र बुधवारी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने सरितादेवी व त्यांच्या प्रशिक्षकांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे सरिता देवी यांना आगामी काळात होणा-या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही.

Leave a Comment