विधानपरिषदेच्या आमदारकीचा धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा

dhananjay-munde
बीड – तेराव्या विधानसभा निवडणुकीत पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आमदार धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सोपविला असून धनंजय यांनी राष्ट्रवादीकडून परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार आणि बहिण पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.

पुतण्या धनंजय आणि भाऊ पंडितआण्णा यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या हयातीतच भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. विधानसभा निवणुकीत परळीमध्ये पंकजा विरुद्ध धनंजय अशी सरळ लढत झाली. यामध्ये धनंजय यांचा २५ हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत धनंजय यांनी पक्षश्रेष्ठींकडे विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा सोपविला आहे.

Leave a Comment