श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली कर्णधार

virat
हैदराबाद – भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे असून विराट कोहली त्याच्याजागी भारताचे नेतृत्व करणार आहे.

भारत दौरा वेस्ट इंडिज संघाने अर्धवट सोडल्यावर श्रीलंकेने भारतात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यास तयारी दर्शवली. यासाठी श्रीलंका संघ पुढील महिन्यात भारतात येणार आहे.

या मालिकेद्वारे बंगालचा वृद्धिमन साहा भारतीय संघात पुनरागमन करणार असून बीसीसीआयच्या निवड समितीने १५ सदस्यीय संघात धोनीच्या जागी वृद्धिमन सहाची निवड केली आहे.

भारत श्रीलंकेविरुद्ध कटक, हैदराबाद, रांची, कोलकाता आणि अहमदाबाद येथे पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. याबाबतची अधिक माहिती लवकरच मिळेल असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.

भारतीय संघ – विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायडू, वृद्धिमन साहा, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद शामी, उमेश यादव, इशांत शर्मा, अमित मिश्रा, मुरली विजय, वरुण एरोन, अक्षऱ पटेल.

Leave a Comment