टेरी वॉल्श यांचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा

terry
नवी दिल्ली – वेतनावरुन वाद झाल्याने मंगळवारी भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले होते.

वॉल्श स्वतः ऑस्ट्रेलियाचे ऑलिंपिकमधील स्ट्रार हॉकीपटू होते. त्यांनी १९ ऑक्टोबर रोजी ‘साई’चे महानिर्देशक जीजी थॉमस यांच्याकडे राजीनामा दिला आहे. देशातील नोकरशहा ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत, त्यामुळे आपल्याला काम करणे अवघड होत असल्याचे वॉल्श यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. नोकरशहाकडून घेतल्या जाणारे निर्णय दिर्घकाळासाठी भारतीय हॉकी आणि खेळाडूंसाठी चांगले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment