एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत दुस-या स्थानी कोहली !

virat-kohli
दुबई – आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत दुस-या क्रमांकावर भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने धडक मारली असून फलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा एल्बी डिव्हिलर्स कोहलीच्या पुढे नंबर वनच्या सिंहासनावर कब्जा केला आहे. तर गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा युवा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने टॉप-१० मध्ये दाखल झाला आहे.

विराट कोहली आणि अव्वलस्थानी कायम असलेल्या एल्बी डिव्हिलर्स यांच्यात आता केवळ १६ गुणांचे अंतर शिल्लक आहे. डिव्हिलर्स सर्वाधिक ८६९ गुणांसह अव्वलस्थानी असून दुस-या क्रमांकावर असलेल्या कोहलीच्या नावे ८५३ गुण आहेत. टॉप टेन फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सहाव्या क्रमांकावर आहे. धोनी यापूर्वीसुद्धा सहाव्याच क्रमांकावर होता. त्याच्या क्रमवारीत बदल झालेला नाही. मात्र, टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला एका स्थानाचे नुकसान झाले. तो आता एका स्थानाच्या घसरणीसह आठव्या क्रमांकावर आहे. भारताचा डावखुरा मधल्या फळीचा फलंदाज सुरेश रैनाला तीन स्थानांचा लाभ झाला. तो आता १८ व्या क्रमांकावरून १५ व्या स्थानी पोहोचला आहे.

Leave a Comment