वर्ल्ड रेकॉर्ड मोडून हॉलिवूड स्टार ‘निक’ बनला सेल्फी चॅम्पियन

nic
आपल्या मोबाइलमधून जिथे असू तिथे स्वतःचा फोटो(सेल्फी) काढण्याची क्रेझ सध्या तरूणाईमध्ये पाहायला मिळत आहे. मुळात नवनविन स्मार्टफोन बाजारात येऊ लागल्याने याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. इतकंच नव्हेतर आता सेल्फी काढण्यातही हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता निक कॅननने नवा इतिहास रचला आहे. अवघ्या एका तासात २८३ सेल्फी काढून वर्ल्ड रेकॉर्ड़ मोडून काढत नवा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फीमेलफर्स्ट डॉट को डॉट यूके च्या अहवालानुसार काही दिवसांपूर्वी एका तासात २७९ सेफ्टी काढण्याचा रेकॉर्ड बनविण्यात आला होता. त्यानुसार निकने यावेळी वेगाने सेल्फी क्लिक करत पूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या भन्नाट कामगिरीबाबत बोलताना निक म्हणाला की, मी फोटो काढण्याचे रितसर प्रशिक्षण घेतले आहे. यासाठी माझा मित्रांनी मला खूप प्रोत्साहन दिले.

Leave a Comment