लग्वाझू फॉल्सचा अनोखा नजारा

lagvaju
ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांच्या सीमेवर असलेले लग्वाझू फॉल्स जगातील सर्वात खोल धबधवा म्हणून ओळखले जातात. या ठिकाणी चारी बाजूंनी फक्त धबधबेच आहेत आणि या पाण्याची लांबी आहे १.७ मैल. या एरियात येथे तब्बल २७५ धबधबे आहेत. लग्वाझू नदीवरच हे सर्व धबधबे आहेत.

अशी कथा सांगितली जाते की तुपी या भाषेतील लग्वाझू याचा अर्थ आहे पाणी. एक देव एका सुंदरीच्या प्रेमात पडला. तिचे नांव नैपी. मात्र या नैपीला तरोबा हा दुसराच तरूण आवडलेला. मग काय ती त्याच्याबरोबर पळून गेली. झाले, इकडे देव रागावला आणि त्याने या लग्वाझू नदीचे अनेक तुकडे पाडले आणि या दोन प्रेमींना धरतीवर सतत पडण्याची शिक्षा दिली. हे धबधबे हेलिकॉप्टरमधून पाहिले असता जे या इंग्रजी अक्षराच्या आकारात दिसतात.

या ठिकाणी अर्जेंटिना आणि ब्राझील या दोन्ही देशांतून जाता येते. पर्यटकांची येथे खूप गर्दी असते. धबधब्यांचे दर्शन जवळून घेता यावे म्हणून येथे विशेष वॉकवे आहेत. अर्जेंटिना आणि ब्राझील मध्ये दोन्हीकडे याच नावाची नॅशनल पार्कही आहेत. या सर्व जंगलाचा परिसर आहे. दोन्ही नॅशनल पार्क युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंदविली गेलेली आहेत.

या धबधब्यांविषयी या भागातील आदिवासींना खूप पूर्वीपासून माहिती होती. मात्र ते बाहेरच्या जगाला कळले ते युरोपियन पर्यटकामुळे. या पर्यटकाने १५४१ साली प्रथम हे धबधबे पाहिले. येथे जाण्यासाठी दोन्ही देशांतून चांगल्या सोयी आहेत. त्यात बसेस, बोटी अशा साधनांचा समावेश आहे. ब्राझीलमधून येथे जायचे असेल तर वसंत ऋतू आणि शरद ऋतू या सर्वात चांगला मोसम. कारण येथे उन्हाळा अतिशय तीव्र असतो आणि आर्द्रताही खूप असते. शिवाय या काळात धबधब्यात पाणीही कमी असते.

Leave a Comment