मनसेला निवडणूकीतून अपात्र ठरवावे – अॅड. विनोद तिवारी

mns
नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उमेदवारांनी मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी सभा घेतल्या. या सभेत राज यांनी भाषा आणि प्रांतवादाला प्रोत्साहन देणारी भाषणे दिल्याची तक्रार भाजपच्या विधी व कायदा आघाडीचे राष्ट्रीय सहसंयोजक अॅड. विनोद तिवारी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार राज यांना निवडणूक आयोगाने १३ ऑक्टोबर रोजी नोटीस पाठविली. राज यांच्या भाषणाने अमराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी, बिहारी, तेलुगू, तमिळ, बंगाली, उडीया, कानडी, मल्याळम, आसामी भाषिक नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. एकूणच प्रांत आणि भाषावादाच्या मुद्द्यांवर मते मागितल्याने देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचला असून लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन झाले आहे, असे तिवारी म्हणाले. परिणामी राज यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून मनसेला निवडणूकीतून अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

Leave a Comment