बोको हरामसोबत युद्धविरामाची घोषणा संशयाच्या भोव-यात

boko
नायजेरिया – इस्लामी कट्‌टरवादी गट बोकोहरामसोबत नायजेरियात सुरू असलेला संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. बोको हरामने अपहरण केलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांची सुटका करण्याची तयारी दर्शवली आहे. नायजेरियाचे लष्कर प्रमुख एलक्स बदेह यांनी संघर्षविरामाची घोषणा केली आहे. असे असले तरी बोको हरामने याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. २००९ पासून सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत दोन हजार नागरिकांचा बळी गेला आहे. सहा महिन्यांपूर्वी २०० शाळकरी विद्यार्थ्यांचे अपहरण केल्यानंतर बोकोहराम संघटनेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निंदा झाली आहे. या विद्यार्थ्यांना उत्तरी बोर्नो येथून पळवून नेण्यात आले आहे. युद्धबंदीच्या या घोषणेनंतरही नायजेरियातील नागरिक याकडे संशयाने पहात आहेत.

Leave a Comment