एटीएमचा वापर करा अनलिमिटेड!

sbi
नवी दिल्ली – जे ग्राहक महिन्याला आपल्या खात्यात २५ हजार ते एक लाखांपर्यंतची रक्कम शिल्लक ठेवतात, अशा ग्राहकांसाठी भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय)खुशखबर आणली आहे. १ नोव्हेंबरपासून सुरू होणा-या नव्या नियमांन्वये या अंतर्गत ग्राहक आपल्या बँकेच्या शाखेत एकदाही गेले नाहीत तर त्यांची एसबीआय एटीएम वापराची सीमा पाचहून नऊपर्यंत वाढवता येईल. म्हणजेच हे ग्राहक नऊवेळा मोफत व्यवहार करू शकतील. देखील या नियमांना परवानगी दिली आहे. याआधी बॅंकेच्या ग्राहकांना एसबीआयच्या ‘एटीएम’मध्ये पाच वेळा आणि अन्य बँकांसाठी तीन वेळा ‘एटीएम’चा मोफत वापर करता येत होता. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी पाच रुपये शुल्क आकारले जात होते. तर तीन पेक्षा अधिक वेळा अन्य बँकांचे‘एटीएम’ मशीन वापरल्यास २० रुपये शुल्क द्यावे लागत होते. परंतू आता ग्राहकांना एटीएमचा वापर अनलिमिटेड करता येणे शक्य होणार आहे.

Leave a Comment