बंगळूरू – भारताची महत्त्वकांक्षी मंगळयान मोहिम यशस्वी झाल्यानंतर आता इस्त्रो अंतराळात मानवी वस्ती अस्तित्वात आणण्यासाठी भारतीय व्यक्तीला तेथे पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे कळते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही आठवड्यात इस्त्रो भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने एक प्रयोग करणार आहे. ज्यात इस्त्रो ३.७ टनाची कॅप्सूल ३.५किलोमीटर उंचीवरून खाली टाकून पॅराशूटच्या साहाय्याने ती अलगदपणे उतरवण्याचा प्रयत्न करून पाहणार आहेत. इस्त्रोचा हा प्रयोग यशस्वी झाला तर नोव्हेंबरच्या अखेरीस रॉकेटच्या सहाय्याने १२० किलोमिटर उंचीवर नेऊन ती खाली सोडण्यात येईल आणि सॉफ्ट लँडिंगनंतर ही कॅप्सूल समूद्रातून काढण्यात येईल. माणसाला अंतराळात पाठवण्याच्या प्रक्रियेत हा प्रयोग पहिला अत्यंत महत्वाचा ठरेल, याच शंकाच नाही.
मंगळयानानंतर आता ‘इस्त्रो’चा नवा उपक्रम…, मानवाला पाठवणार अंतराळात
इस्त्रोने क्रू मॉड्यूल नावाच्या या कॅप्सूलची निर्मिती अत्यंत अल्प खर्चात केली आहे. तसेच मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर तंत्रज्ञानासाठी फक्त १४५ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतूदीला केंद्राकडून मान्यता मिळाली आहे.
या विकास कामासाठी फक्त दीड वर्षांचा कालावधी लागला. माणसाला अंतराळात पाठवण्यासाठी प्रचंड गुंतवणूक आवश्यक असून सात वर्षापूर्वी केलेल्या एका अभ्यासानुसार १२,४०० कोटी रुपये अपेक्षित होते. इस्त्रो आता सर्व आवश्यक तंत्रज्ञान विकसित करुन प्रगतीच्या मार्गावर आहे. नोव्हेंबर महिन्यातील प्रयोगात वापरण्यात येणारे क्रू मॉड्यूल हे अंतराळातील मानवी मोहिमेसाठी बांधण्यात येणाऱ्या याना सारखेच असून फक्त इटर्नल लेआऊट वेगळे आहेत, असेही सांगण्यात येत आहे.