सीरियामध्ये दहशतवादी हल्ल्यात ६६२ ठार

blast
बेरुत – सीरिया सीमेवर असलेल्या कुर्द शहरातील कोबाने परिसरात मागील एक महिन्यापासून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांकडून हल्ले सुरु आहेत. अशी माहिती सीरीया मानवधिकार (एसओएचआर) आयोगाने दिली आहे. या हल्ल्यामुळे आतापर्यंत ६६२ लोकांचा मृत्यू झाला आहे. एसओएचआरमध्ये नोंदवण्यात आलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी १७ नागरिकांची हत्या केली असून चार जणांचा शिरच्छेद केला आहे. तर अन्य कोबाने आणि आसपासच्या गावांत झालेल्या गोळीबारात मारले गेले. कुर्दकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात २६८ जण ठार झाले आहेत. दरम्यान अमेरिका नेतृत्वाखाली जिहादकडून करण्यात आलेल्या विमान हल्ला आणि कुर्ददलाच्या संघर्षवादात ३७४ दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये आत्मघाती हल्ला घडवून आणलेल्या चार हल्लेखोरांचा देखील समावेश आहे. अमेरिकेचे विशेष दूत जॉन एलेन यांनी सांगितले की, जिहाद्यांपासून वाचविण्यासाठी कोबाने परीसरात हा हल्ला करण्यात आला.

Leave a Comment