मुंबई शेअर बाजार १०९, निफ्टी ३१ अंकांनी वधारला

share-market
मुंबई – जागतिक शेअर बाजारांत आलेल्या तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. त्यामुळे मुंबई शेअर बाजार मागील तीन सत्रात आज पहिल्यांदा १०९.१९ अंकांनी वाढ होऊन बाजार २६,१०८.५३ अंकांवर बंद झाला. दिवसभरात बाजाराने २५,९१०.७७ निचांकी, तर २६,२४८.५४ अंकांचा उच्चांक गाठला. दरम्यान हिरो मोटो कॉर्प, एचडीएफसी बॅंक, भेल, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि भारतीय स्टेट बॅंक आदींच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बाजारातील ३० पैकी २१ कंपन्यांचे शेअर्स वधारले, तर ९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. शेअर्स राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ३१.५० अंकांनी (०.३२ टक्के) वाढ होऊन बाजार ७,७७९.७० वर बंद झाला. दरम्यान दिवसभरात ७,८१९.२० चा उच्चांक गाठला.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते कंपन्यांचे चांगले प्रदर्शन आणि महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणूकांचे एक्झिट पोलच्या निकालात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळण्याच्या अपेक्षेमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. दिल्लीतील शेअर ब्रोकर मनोज छोररिया म्हणाले की, ऑटो आणि बॅंकिंग क्षेत्रातील शेअर्समधील तेजीमुळे निर्देशांक वाढीला मदत मिळाली. हिरो मोटो कॉर्पमुळे बाजारात तेजी दिसून आली. कंपनीच्या दुस-या तिमाफी नफ्यात ५८.६२ टक्क्यांनी वाढ होऊन ७६३ कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तसेच महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि मारुती सुझूकी कंपन्यांचे शेअर्स देखील तेजीत राहिले.

Leave a Comment