मुंबई महापालिकेकडून १६ महिन्यांत ४०० कोटींची जलदेयक थकबाकी वसुली

bmc
मुंबई – मुंबई महापालिकेच्या केंद्र, राज्य सरकार, म्हाडा, एमएमआरडीए व्यवस्थापना, खासगी व्यापारी आणि निवासी ग्राहकांकडे गेल्या अनेक वर्षांपासून १,१२८ कोटींची जलदेयकापोटी थकबाकी प्रलंबित होती. पालिकेने थकबाकी वसुलीसाठी एकरकमी थकबाकी करणा-यांना २ टक्के अतिरिक्त आकारलेली रक्कम माफ करण्यासाठी अभय योजना राबवली. या योजनेअंतर्गत पालिकेने १६ महिन्यांत शासकिय व खासगी व्यापारी यांच्याकडून १६८.१७ कोटी रुपये आणि इतर निवासी थकबाकीदारांकडून २३२.५८ कोटी रुपये अशी ४००.७५ रुपयांची वसूली केली आहे. आता उर्वरित ७२८ कोटींची थकबाकी वसुली करण्यासाठी पालिकेने या अभय योजनेला २१ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला आहे. पालिकेने १६ महिन्यांत शासकीय व खासगी अशी १६८.१७ कोटींची थकबाकी वसुली केली. यामध्ये शासकीय थकबाकी ७५.२४ कोटी व खासगी थकबाकी ९२.९३ कोटी रुपये आहे.

Leave a Comment