भारत दौरा अर्धवट सोडणार वेस्ट इंडिज

west-indies
धर्मशाला – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ यांच्यात खेळाडूंच्या मानधनात कपात केल्याच्या मुद्दयावरुन सुरु असलेल्या वादामुळे विंडीज संघाने भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

धर्मशाला येथे सुरु असलेला सामना वेस्ट इंडिजच्या भारत दौ-यातील शेवटचा सामना असणार आहे. तर उर्वरित एक एकदिवसीय, एक टी-२० आणि तीन कसोटी सामने होणार नाहीत.

याबाबत बीसीसीआयने वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वेस्ट इंडिज दौ-यातून माघार घेत असल्याचा निर्णय अचानक घेण्यात आलेला आहे. याबाबत वेस्ट इंडिज संघाचे व्यवस्थापक रिची रिचर्डसन यांनी आज सकाळी आम्हाला ईमेलद्वारे ही माहिती दिल्याचे बीसीसीआय सचिव संजय पटेल यांनी सांगितले.

विंडीज संघाने दौ-यातून माघार घेतल्याने बीसीसीआकडून श्रीलंका संघाला पाच एकदिवसीय मालिकेसाठी भारतात आमंत्रित करण्यात आले आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेनकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे.

Leave a Comment