बहुप्रतिक्षित आयफोन ६ आणि ६ प्लसच्या विक्रीला सुरुवात

iphone
मुंबई – भारतात बहुप्रतिक्षित आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. खरेदी करण्यासाठी मुंबईसह देशभरातील अॅपलच्या गॅलरीमध्ये आयफोनप्रेमींची झुंबड पाहायला मिळत आहे. अॅपल कंपनीने भारतात पहिल्यांदाच आयफोनच्या विक्रीला सुरुवात केली आहे. अॅपलने आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसचे ५५ हजार हॅण्डसेटचा स्टॉक भारतात पाठवला आहे. विशेष म्हणजे मंगळवारपर्यंत २१ हजार हॅण्डसेटची प्री बुकिंग झाली आहे. त्यामुळे मोबाईलप्रेमींची मागणी पाहता कंपनी पुढील आठवड्यातही आयफोनचा स्टॉक भारतात पाठवणार आहे. १२८ जीबी गोल्ड कलरच्या आयफोनची मागणी सर्वाधिक आहे, असे डिलरचे म्हणणे आहे. देशभरातील १२०० डिलर्सतर्फे आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसची विक्री होणार आहे. आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसचे तीन सीरिज १६, ६४ आणि १२८ जीबी इंटरनल मेमरीसह उपलब्ध आहेत. १६ जीबीच्या आयफोन ६ची किंमत ५३,५०० रुपये, ६४ जीबीची किंमत ६२,५०० रुपये आणि १२८ जीबी आयफोनची किंमत ७१,५०० रुपये आहे. तर १६ जीबीच्या आयफोन ६ प्लसची किंमत ६२,५०० रुपये, ६४ जीबीच्या फोनची किंमत ७१,५०० रुपये आणि १२८ जीबीच्या आयफोनची किंमत ८०,५०० रुपये आहे.

Leave a Comment