पाकिस्तानातून आता बॉम्बऐवजी येणार आता बटाटे

batate
नवी दिल्ली – देशात महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याने गेल्या अनेक वर्षापासून पहिल्यांदाच महागाईचा दर कमी झाला होता, असे असले तरी बटाट्याचे भाव मात्र चढेच राहिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आता बटाट्याची आयात करणार आहे. कृषी सचिव आशिष बहुगुणा यांनी सांगितले की, भारत युरोपखेरीज पाकिस्तानमधून बटाटे आयात करू शकतो. भारतीय बाजारात बटाट्याची आवक वाढली तर भाव खाली येतील असे सरकारचे मत आहे. कृषीमंत्री राधासिंह मोहन यांनी सांगितले की, सरकार बटाट्याचे भाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. किरकोळ बाजारात बटाट्याचे भाव ४० रुपये किलो पोचले आहेत. त्यामुळे सहकारी तत्वावर नाफेडमार्फत निविदा काढून बटाटे आयात केले जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत आयात केलेला बटाटा बाजारात येऊ शकेल असे बहुगुणा म्हणाले. देशांतर्गत बटाट्याचे पीक येण्यास जानेवारी महिना उजाडणार असल्याने सरकारने बटाटा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment