पाकिस्तानातच ८० टक्के पोलिओचे रुग्ण…

who
इस्लामाबाद – देशभरातील ८० टक्के पोलिओप्रकरणी जागतिक आरोग्य विभागाने पाकिस्तानला जबाबदार ठरवले आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार लहानपणी मुलांना पोलिओचे डोस न दिल्यामुळे अशाप्रकारचे रुग्ण वाढत असल्याचे म्हटले आहे.

लहान मुलांना पोलिओचे डोस देणे आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावर कर्मचाऱ्यांची तपासणी करणे गरजेचे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तान शहरात नऊ पोलिओचे खटले समोर आले आहेत. त्यामुळे पाकमध्ये भयावह आजारांनी सुमारे २०२ लहान मुलं त्रासलेली आहेत. यापूर्वी २००० मध्ये १९९ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत अशा पोलिओच्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व यंत्रण निष्फळ ठरली आहे. याउलट पाकिस्तानात मागील वर्षभरात अधिकाधिक पोलिओच्य रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, असेही डब्ल्यूएचओच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment