कनिष्ट बुद्धिबळ स्पर्धेत अखेर नारायणन आणि नंदिता ठरले ग्रॅंडमास्टर

chess
पुणे – जागतिक कनिष्ट बुद्धिबळ स्पर्धेत सुरुवातीपासून आश्वासक कामगिरी करणा-या आंतरराष्ट्रीय मास्टर्स सुनील धूत नारायणन याने ९ व्या फेरीत भारतीय ग्रॅंडमास्टर विदित गुजराथीला बरोबरीत रोखले. मुलींमध्ये भारताच्या प्रत्यूषा बोडा हिला पी वी नंदिताने नमवून महिला आंतरराष्ट्रीय मास्टर्सचा दर्जा मिळविला आहे. नायणनने सुरुवातीच्या काही फे-या वगळता ग्रॅंडमास्टर्सला साजेसा खेळ केला. सातव्या फेरीनंतर त्याला किमान ड्रा ची गरज असताना आठव्या फेरीत तो चीनच्या वेर्इर्इ कडून पराभूत झाला होता. अखेर केरळच्या विदित गुजराथी याला बरोबरीत रोखून त्याने कनिष्ट ग्रँडमास्टर्सचा खिताब मिळविला. तामिळनाडूची १८ वर्षीय नंदिता हिने ९ व्या फेरी अखेर सात गुणांची कमार्इ करून महिला आंतरराष्ट्रीय मास्टर्सचा खिताब मिळविण्याचा मान मिळविला.

Leave a Comment