पाकिस्तानातील प्रत्येक शहरापर्यंत मा-याची ‘निर्भय’मध्ये क्षमता

nirbhay
नवी दिल्ली – शुक्रवारी देशाचे संरक्षण क्षेत्रातील सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी ‘निर्भय’ या सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्काराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांना संबोधित केले.

भारताने यापूर्वी रशियाच्या सहकार्याने ब्रह्मोस हे ध्वनीपेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारे आणि २९० किलोमीटरचा मारक टप्‍पा गाठणारे क्रूझ प्रकारचे क्षेपणास्त्र यशस्वीरित्या विकसित केले आहे.

स्वदेशी बनावटीचे असलेले आणि दूरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या निर्भय ची दुसरी चाचणी चांदीपूरच्या इंटीग्रेटेड टेस्ट रेंज (आईटीआर) येथे केली जाईल. याविषयी बोलताना डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या एका शास्त्रज्ञांनी सांगितले की, २०१३ मध्ये याचठिकाणी या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेण्यात आली होती. पण मार्ग चुकल्यामुळे ही चाचणी अर्ध्यातच थांबवण्यात आली होती. क्षेपणास्त्राच्या नेव्हिगेशन प्रणालीमध्ये काही त्रुटी होत्या. त्या दूर करण्यात आल्या असून या क्षेपणास्त्राची मारा करण्याची क्षमता १००० किलोमीटरपर्यंत आहे, असेही शास्त्रज्ञांनी सांगितले. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्रामध्ये अण्वस्त्र वाहून नेण्याचीही क्षमता आहे. पाकिस्तानची सर्व प्रमुख शहरे या मिसाईलच्या रडारवर येऊ शकतात.

‘निर्भय’ ची ही चाचणी यशस्वी ठरल्याने भारताने अमेरिकेच्या टोमाहॉक आणि पाकिस्तानच्या बबुरला चोख उत्तर दिले आहे.

Leave a Comment