हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक भुईसपाट

farmer
गोंदिया – मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. या दोन दिवसात शेतक-यांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच पुन्हा तिरोडा, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव या तालुक्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने हजारो हेक्टरमधील धानपीक भुईसपाट झाले आहे. तर ज्या शेतक-यांनी अल्पमुदतीचे धानपीक कापून ठेवले होते. ते धानपिकही या पाण्याने खराब झाले आहे.

ऐन दिवाळीच्या वेळी येत असलेला पाऊस हा बळीराजासाठी दुष्काळात तेराव्या महिन्यासारखा ठरत असल्याने बळीराजा निसर्गाच्या प्रकोपाने पुरता हतबल झाला आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टरच्या वर शेतजमीन वरथेंबी पावसावर अवलंबून असते. जिल्ह्यात लघु व मध्यम सिंचन प्रकल्प, मामा तलाव या माध्यमातून सिंचनाची सोय होत असली तरी ५० टक्केपेक्षा अधिक जमिनीचे सिंचन हे वरथेंबी पावसावरच अवलंबून असते. सध्या अल्पमुदतीचे धानपीक कापणीला आले आहे. अनेक शेतक-यांनी दिवाळीपूर्वी हातात मिळकत यावी म्हणून हे धानपीक कापून ठेवले. मात्र मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु आहे.

Leave a Comment