स्वित्झर्लंड देणार काळ्या पैशासंदर्भात माहिती

black-money
बर्न – भारताला परदेशी बँकांमध्ये असलेल्या काळ्या पैशाबाबतची माहिती देण्यास स्वित्झर्लंडने तयारी दर्शवली असून त्यानुसार भारताच्या विनंतीबाबत नक्कीच विचार केला जाईल असे स्वित्झर्लंडने म्हटले आहे. भारताचे महसूल सचिव शक्तिकांता दास आणि स्वित्झर्लंडचे सचिव जॅक डे वॅटेइविले यांच्यात बर्न येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली.

भारताच्या विनंतीवरुन बँकेतील भारतीय नागरिकांच्या काळ्या पैशासंदर्भातील माहिती पुरवण्यास स्विसच्या अधिका-यांनी तयारी दर्शवली असून तसेच अवैध बँकिंगबाबतचीही माहिती भारताला पुरवण्यात येईल अशी माहिती स्विस अधिका-यांनी दिली.

Leave a Comment