साडेतीन रुपयांनी कमी होणार डिझेलचे दर

diesel
नवी दिल्ली – यापूर्वी मंगळवारी पेट्रोलच्या दरात एक रुपयाने कपात करण्यात आल्यानंतर आता डिझेलच्या दरात तब्बल साडेतीन रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने तेल पुरवठा करणा-या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना सध्या डिझेलच्या विक्रीवर ३.५६ रुपयांचा फायदा होत असल्यामुळे डिझेलच्या दरात दिवाळीपूर्वी कपात होणार आहे. डिझेलच्या दरात कपात झाल्यास वाहतूकदारांना याचा दिलासा मिळेल. यामुळे महागाई कमी होण्यासही मदत होईल.

गेल्या महिन्यापासून तेल कंपन्या डिझेलच्या विक्रीतून फायदा कमावित आहेत. मात्र महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने दरवाढ कमी केली नव्हते. मात्र आता महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया झाली असल्याने आता डिझेल दरकपातीची घोषणा होण्याची शक्यता आहे. डिझेलच्या दरात केव्हा कपात होईल असे विचारले असता, सरकार योग्यवेळी योग्य निर्णय घेईल, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

Leave a Comment