संपूर्ण देशात मोबाईल पोर्टेबिलीटी लागू होणार

mobile
दिल्ली -संपूर्ण देशात मोबाईल पोर्टेबिलीटी लागू करण्याचा मार्ग आता खुला झाला असून येत्या ३१ मार्चपर्यंत ही सुविधा मोबाईल ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाईल असे समजते. यामुळे मोबाईल ग्राहक एका सर्कलमधून दुसर्‍या सर्कलमध्ये जाताना अथवा दुसर्‍या कंपनीची सेवा घेताना आपला मोबाईल नंबर कायम ठेवू शकणार आहेत. सध्या ही सुविधा फक्त ग्राहकाच्या दूरसंचार सर्कलपुरतीच मर्यादित होती.

वास्तविक ट्रायने ही सुविधा गतवर्षापासूनच लागू करण्याचे प्रयत्न चालविले होते. मात्र त्यामुळे मोबाईल कंपन्यांवर आपले ग्राहक सांभाळण्यासाठी दबाव येत होता. परिणामी या टेलिकॉम कंपन्यांनीच सरकारवर दबाव आणून त्याबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवणे भाग पाडले होते असे सांगितले जात आहे. नवीन सरकार सत्तेवर येताच हा प्रलंबित निर्णय त्वरीत घेतला जात आहे. दूरसंचार आयोगाने या संबंधातला प्रस्ताव मंजूर केला असून तो आता दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे पाठविला जात आहे.

रविशंकर यांनीही हा प्रस्ताव त्वरीत मंजूर करण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते. सध्या एकाच सर्कलपुरती पोर्टेबिलीटी उपलब्ध असताना देशातील १३ कोटी मोबाईल ग्राहकांकडून या सुविधेसाठी मागणी होती. संपूर्ण देशात ही सेवा उपलब्ध झाल्यानंतर ही मागणी अनेक पटींनी वाढणार आहे.

Leave a Comment