यात्रेकरुंना हिवाळ्यातही करता येईल चारधाम यात्रा

chardham
देहरादुन – यात्रेकरुंना आता हिवाळ्यात देखील चारधाम यात्रा करता येणार आहे. शितकाळात प्रवास स्थळावर पोहचण्याठी प्रवाशांना डोलिची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. ही यात्रा आतापर्यंत सहाच महिने केली जात होती. तीर्थपुरोहित आणि पंडा समाजाने हिवाळ्यातही ही यात्रा जारी ठेवण्यास सहमती दर्शवल्यानंतर आता यात्रेकरुंना वषर्भरात केव्हाही चारधामयात्रा करता येणार आहे. त्यासाठी सरकारकडूनही परिसरातील रस्त्यांची पुनर्बांधणी आणि यात्रेकरुंना इतर मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पंडा समाज आणि तीर्थपुरोहीतांना विचारण्यात आले की, शीतकाळात चारधाम यात्रा जारी ठेवण्याने परंपरा आणि मान्यतेत कोणाताही अडथळा येणार नाही. यावर तीर्थपुरोहीत आणि पंडा समाजाच्या प्रतिनिधिंनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, शास्त्रानुसार आणि धर्मानुसार तीर्थयात्रेला मान्यता प्राप्त आहे. त्यामुळे कोणतीही मान्यता भंग होणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी चारधाम यात्रा वर्षातून सहाच महिने होत होती त्यामुळे व्यापा-यांना बाकीचे सहा महिने वाट पाहावे लागत होते. सरकारच्या या घोषणेने क्षेत्रातील व्यापा-यांच्या चेह-यावर आनंद दिसत आहे. त्यामुळे देशात व्यापार आणि व्यवसायात देखील वृद्धी होण्यास मदत होईल.

Leave a Comment