मुंबई शेअर बाजार ३५०, निफ्टीत ११५ अंकांची घसरण

share-market
मुंबई – मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३५० अंकांनी घसरून २६ हजार अंकांपेक्षा खालच्या स्तरावर येऊन पोहोचला. जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे बाजारात सुरू असलेली विक्रीच्या सत्रामुळे निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली. दरम्यान दोन महिन्यांनंतर निर्देशांक २६ हजारांपेक्षा खाली आला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३४९.९९ अंकांनी (१.३३ टक्के) घसरण होऊन २५,९९९.३४ अंकांपेक्षा खाली आला. हा स्तर १३ ऑगस्टनंतर निर्देशांकात झालेला सर्वाधिक खालचा स्तर आहे. तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात ११५.८० अंकांनी (१.४७ टक्के) घसरण होऊन ७,७४८.२० अंकांवर पोहोचला. दिवसभरात निर्देशांकाने ७,७२९.६५ चा निचांकी, तर ७,८९३.९० चा उच्चांकी स्तर गाठला.

रेलिगेयर सिक्युरिटीजचे अध्यक्ष जयंत मांगलिक यांनी सांगितले की, नकारात्मक जागतिक संकेत आणि कमजोर बृहद आर्थिक आकड्यांमुळे बाजारात घसरण झाली. मागील आठवड्यात शेअर बाजारात जी तेजी पाहायला मिळत होती. ती आंतरराष्ट्रीय बाजाराकडून मिळत असलेल्या खराब संकेतांमुळे झालेली नाही. सध्या बाजाराची गती अत्यंत सपाट आहे. निर्देशांकात रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा आणि महिंद्रा, लार्सन ऍण्ड टुब्रो, इन्फोसिस, आयसीआयसीआय बॅंक, एसबीआय, ओएनजीसी, एचडीएफसी, डॉ. रेड्डीज, भारती एयरटेल आणि टाटा पॉवर इत्यादी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४.२५९ टक्क्यांनी घसरण झाली. तसेच पॉवर २.९१ टक्के, धातू २.२८ टक्के, ऑटो २.०९ टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू २.०६ टक्के, तेल आणि नैसर्गिक गॅस १.८९ टक्के, माहिती-तंत्रज्ञान १.५७ टक्के, आरोग्य सेवा १.४६ टक्के, बॅंकिंग १.२४ टक्क्यांनी घसरण झाली. स्थावर मालमत्ता ०.२२ टक्के, ‍एफएमसीजी ०.०४ टक्के साधारण कमजोरी दिसून आली.

Leave a Comment